Abhijeet Khandkekar Accident | Mazhya Navryachi Bayko – गुरूचा झाला अपघात!

Abhijeet Khandkekar Accident | Mazhya Navryachi Bayko – गुरूचा झाला अपघात!

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात थोडक्यात वाचला आहे. कारमधून शूटिंगला जात असताना त्याच्या कारच्या दिशेने एक धातूचा पाईप घरंगळत आला आणि त्यामुळे कारची समोरची काच फुटली. परंतु अभिजीतला कोणतीही दुखापत झाली नाही.

अभिजीतने एका मुलाखतीत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे. तो म्हणाला कि ” शूटिंगसाठी कारमधून  जात असताना वाटेतच मीरा भाईंदर पुलावर हा अपघात झाला. माझ्या कारसमोर एक मोठी ट्रक चालत होती. त्या ट्रक मध्ये धातूचे मोठमोठे पाईप  होते. त्यातील एक पाईप माझ्या कारच्या दिशेने  घरंगळत आले. तो पाईप माझ्या गाडीच्या समोरच्या काचेवर येऊन पडला आणि त्यामुळे माझ्या कारची काच फुटली. या अपघातात मी थोडक्यात वाचलो. नंतर तो पाईप पुलावरून खाली पडला. पुलाखाली असलेल्यांवर हा पाईप पडू नये याची मला खूप काळजी होती. परंतु या अपघातातून मी थोडक्यात वाचलो, मला कोणतीही दुखापत झाली नाही.”

 

 

अभिजीतने अपघातातून वाचल्यानंतर त्याच्या कारचे फुटलेल्या काचेचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आणि आपण सुखरूप असल्याचे चाहत्यांना सांगितले. अभिजीत हा माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे अभिजीतला वेगळीच ओळख मिळाली आहे. हि मालिका महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *