काय म्हणाले “चंपा” विषयी अजितदादा पवार

काय म्हणाले “चंपा” विषयी अजितदादा पवार

आज पिंपरी चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिल. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. अजित पवार म्हणतात, ‘ त्या “चंपा” ला पवारांशिवाय काही दिसत नाही असा स्फोट त्यांनी भाजपच्या एका मोठ्या नेत्याबद्दल केला. आता हे चंपा कोण हा प्रश्न सर्वां पडला असेल.

अजित पवार म्हणतात कि, त्या चंपा ला पवारांशिवाय काही दिसत नाही. चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे जस अप म्हणजे अजित पवार तस चम्पा म्हणजे चंद्रकांत पाटील, असं स्पष्टीकरण त्यांनी दिल. चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होत कि, शरद पवारांना राजकारणातून कायमच दूर करणार. याला सडेतोड उत्तर देत अजित पवार पुढे म्हणतात कि, ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळी ते असच म्हणतात. त्या चंपा ला पवारांशिवाय काही दिसत नाही असा टोला लगावत त्यांनी चनद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. }��P 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *