भाजपचा सत्तेचा माज उतरवायचा असेल तर आघाडीच्या हातात सत्ता द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळारपूर मधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. भाजपचा सत्तेचा माज उतरायचा असेल तर आघाडी सरकारच्या हातात सत्ता द्या, अशी हाक त्यांनी जनतेला दिली.

अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात शिवसेना भाजपवर कडाडून हल्ला केला. अजित पवार भाषणात म्हणतात, ” आमच्या हाती सत्ता दिल्यावर तीन महिन्यांमध्ये सातबारा कोरा न केल्यास पवारांची औलाद आहे असं सांगणार नाही“, असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिल. पुढे अजित पवार म्हणतात, ” सरकार शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसेही देत नाही.

अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे सरकारचे पाप आहे. सरकारला शेतीतील काही काळात नाही. रोग कोणता आहे हेच त्यांना माहित नाही तर ते शेतकऱ्यांना मदत काय करणार“, अशा शब्दात त्यांनी सरकारला फटकारलं.

Title: Ajit Pawar velarpur sabha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *