मुख्यमंत्र्यांबद्दल अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांबद्दल अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राजकीय वातावरणात खूप उष्णता जाणवत आहे. सगळे पक्ष एकमेकांवर जोरदार टीकेचा प्रहार करत आहे. याच दरम्यान अजित दादा पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात केला. एका मुलाखती दरम्यान हा स्फोट त्यांनी केला.

एका मराठी वाहिनीच्या मुलाखतीदरम्यान बोलत असताना अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हणाले, आमची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. २०१४ साली सत्ता येण्याआधी याच आश्वासनही भाजपकडून देण्यात आलं होत. मात्र , महाराष्ट्रातील जनमत लक्षात घेता भाजपने हा मुद्दा मागे सोडलेला दिसतो.

अजित दादा पवार यांनी गौप्यस्फोट करताना म्हटलं कि, आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही विदर्भ वेगळा करू. कारण राज्यासोबत आमची केंद्रामध्येही सत्ता आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत बोलताना सांगितलं होत, असा घणाघात अजित पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *