कोण असेल पवार कुटुंबाच्या राजकीय गादीचा वारसदार?

कोण असेल पवार कुटुंबाच्या राजकीय गादीचा वारसदार?

पवार कुटुंबीयांचं तरुण तडपदार नेते रोहित पवार हे कर्जत-जामखेड या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहे. त्यांच्या समोर भाजपचे मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच तगडं आव्हान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते जीवतोड मेहनत घेत आहे. नुकतंच, शरद पवार यांना पवार कुटुंबाचा राजकीय वारसदार कोण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पवार साहेब म्हणाले होते, जो कर्तृत्वान असेल, ज्याचा जनतेवर चांगला प्रभाव असेल तो ठरेल. असाच प्रश्न अजित पवार यांना देखील करण्यात आला.

अजित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं कि, तो येणार काळच ठरवेल. अजितदादा पुढे रोहित पवार यांच्याविषयी बोलताना म्हणतात, रोहित हा खूप मेहनती आहे. त्याला राजकारणाची खूप आवड आहे. त्याला सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे. विकासकाम करण्याची ताकद रोहितमध्ये आहे. अशा शब्दांत अजितदादांनी रोहित पवार यांचं कौतुक केलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *