आकाश ठोसर दिसणार या नवीन भूमिकेत

१९६२ साली भारत आणि चीन या देशांमद्धे एक युद्ध झालं. याच युद्धाची गोष्ट आता Disney Hotstar वर ‘1992 The War In The Hells’ ह्या सिरीज मधून दाखवण्यात येणार आहे. या सिरीज चा पहिला टीजर ही रिलीज झाला आहे. ही सिरीज २६ फेब्रुवारीला Disney Plus Hotstar Vip वर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजचं दिग्दर्शन अभिनेते, निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले आहे. यामद्धे अभय देओल आणि अभिनेता आकाश ठोसर मुख्य भुमिकेत आहेत.

आकाशने याआधी देखील बंदूक हातात घेऊन एक फोटो शेअर करत “लाशे बिछा दुंगा ,लाशें.” असं कॅप्शन दिलं होतं. आकाश म्हणाला हा प्रोजेक्ट माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. बालपणापासून माझे भारतीय सेनेमद्धे जाण्याचे स्वप्न होते आणि मी चित्रपटसृष्टीमद्धे येण्यापूर्वी लष्करामद्धे निवड होण्यासाठी दोनदा परीक्षा देखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमद्धे देखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्या देशाच्या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामद्धे केले असते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *