Alka Kubal Daughter – Eashanee Athalye is a Pilot Now

Alka Kubal Daughter – Eashanee Athalye is a Pilot Now

आजकालच्या मुली मुलांना मागे टाकून यशाचं शिखर गाठत आहेत. एक काळ असा होता जेव्हा मुलगी झाली तर त्याला लोक म्हणायचे कि यान नक्कीच काहीतरी पाप केलं असेल, म्हणून याला मुलगी झाली. मुलींना घराबाहेर पडणं पण शक्य नव्हतं, मग शिक्षण तर लांबची गोष्ट.

पण आत्ता काळ बदलत चालला आहे. मुली चंद्रापर्यंत पोचल्या आहेत. आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा पण पुढे जाऊन काम करत आहेत. आईवडील देखील मुलींना पूर्णपणे सपोर्ट करत आहेतच.

अशीच एक मुलगी म्हणजे अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी. लहानपणापासूनच तिला विमानाची खूप आवड होती. तिची वैमानिक व्हायची जिद्द होती म्हणून तिने वैमानिकचे शिक्षण घेतलं आणि आज ती पायलट बनली आहे.

आईवडील जर कलाकार असले तर मुलं देखील कलाकार बनतात, आईवडील डॉक्टर असतील तर मुलं देखील डॉक्टर होतात, आईवडील बिजनेसमॅन असतील तर ते पण बिजनेसमॅन होतात कारण त्यांना ते करणं सोपं जात.

पण प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलीला अभिनय करायचा वारसा असताना देखील तिने वैमानिक व्हायचं ठरवलं आणि आज तिने इतिहास बदलून टाकला. आज ईशानी एक कलाकार न होता ती आज विमानाची पायलट बनली आहे. ईशानीने तिच्या आवडीचे क्षेत्र निवडले आणि त्यातच उंच भरारी घेतली.

तर मित्रानो अलका कुबल यांची मुलगी ईशानी वैमानिक झाली आहे यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कंमेंट मध्ये लिहा.

Photos:

 

Tags: Alka Kubal Daughter, Alka Kubal, Eashanee Athalye, Alka Kubal Daughter Eashanee, अलका कुबलची मुलगी, ईशानी आठल्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *