अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड वाद उदयनराजे यांच्या दरबारी

जेष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या अलका कुबल यांनी रविवारी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले  यांची भेट घेतली . अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्याशी सुरू असलेल्या वादाबद्दल तसेच ”आई माझी काळुबाई’ ‘ह्या टीमला येणाऱ्या धमक्यांप्रकरणी  यावेळी चर्चा झाली .

एका मुलाखतीत अनवधानाने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी व ”आई माझी काळुबाई” ही टीव्ही मालिका तडकाफडकी सोडणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व मालिकेच्या निर्मात्या ,जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यातील वाद खासदार उदयनराजे भोसले यांच्या दरबारात गेला आहे. अलका कुबल यांनी स्वतः साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली .

एका सहकलाकारने आई – बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्राजक्ता गायकवाड हिने केला होता. प्राजक्ताने असं सांगितल की मी हे सर्व अलका कुबल ह्यांना सांगूनही त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिल  नाही म्हणून मी ही मालिका सोडली आहे. अलका कुबल ह्यांनी तिचे आरोप फेटाळताना तिच्याबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या,  हा वाद पेटल्यानंतर काही संघटनांनी अलका कुबल यांनी माफी मागावी, असं म्हंटल . ”स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेचा उल्लेख एकेरी  केल्यानेही त्यांच्यावर टीका होत होती .

सतत येणारे धमक्यांचे फोन आणि तथ्यहीन आरोप यांच्याविरोधात आम्ही उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. मी स्वतः मराठी कुटुंबात जन्मले,  त्यामुळे मी विनंती करते की खोट्या आरोपांवर विश्वास ठेऊ नका. कोणत्याही धर्म किंवा जाती विरोधात आम्ही नाही’, असं अलका कुबल यांनी इनस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमद्धे लिहिल .

या सगळ्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी रविवारी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. “जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी प्राजक्ता गायकवाड यांच्याशी देखील चर्चा केली. हा वाद लवकरच मिटून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली”,  असं त्यांनी म्हंटल आहे.

Tags: alka kubal met udayanraje bhosale in satara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *