अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील दीपा , कार्तिक , सौदर्या इनामदार या पात्रांनी रसिकांच्या मनात जसं घर केल आहे . तसेच या मालिकेतील निगटीव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. याच मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरेने टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केले आहे. फार कमी लोकांना महित आहे की अनघा ही भगरे गुरुजींची कन्या आहे.

अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची लेक आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत. ‘रंग माझा वेगळा’ ही अनघा ची पहिलीच मालिका असुन , ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे. अनघाने एसएनडिटी कॉलेज मुंबईतुन मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. टिने काही काळासाठी ‘कोठारे व्हिजन’ मध्ये पीआर ब्रॅंड मॅनेजर पदाचा भारही सांभाळला होता.

सध्या झी मराठीवर ‘वेध भविष्याचा’ आणि नुकत्याच सुरू झालेल्या पौराणिक मालिका ‘घेतला वसा टाकू नको’ यात भगरे गुरुजी पाहायला मिळत आहे.

 तर तुम्हांला अभिनेत्री अनघा भगरेचा अभिनय कसं वाटतो हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *