स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कोंडाजी बाबा फर्जंद कोण आहेत?

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता आनंद काळे यांनी कोंडाजी बाबा म्हणजेच कोंडाजी फर्जंद यांची भारदस्त भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोंडाजी बाबा यांची भूमिका साकारणारे अभिनेते आनंद काळे यांच्याबद्दल!

आनंद काळे यांचा जन्म २८ सप्टेंबर १९७२ साली कोल्हापूर येथे झाला असून ते लहानाचे मोठे देखील कोल्हापूर मध्येच झाले. त्यांनी आपले शालेय शिक्षण सौ नलिनी शांताराम पंत वालावलकर प्रशाला कोल्हापूर येथून पूर्ण केले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथून पूर्ण केले आहे.

अभिनेते आनंद काळे यांनी अभिनय क्षेत्राची सुरुवात नाटकांपासून केली. आमच्या हीच प्रकरण हे त्यांचं एक गाजलेलं मराठी नाटक. त्यांनी खूप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ETV वाहिनीवरील चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. नंतर त्यांनी कलर्स मराठी वरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेत देखील काम केले असून आत्ता ते सोनी मराठी वरील  मी तुझीच रे या मालिकेत रिया च्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कोंडाजी बाबा यांच्या भारदस्त भूमिकेमुळे. आनंद काळे यांनी हिंदी चित्रपट P Se Lekar PM Tak या हिंदी चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

अभिनेते आनंद काळे यांचे हॉटेल कार्निवल आणि हॉटेल राजपुरुष नावाचे २ हॉटेल्स आहेत. त्याशिवाय त्यांनी महालक्ष्मी सिने सर्विसेस नावाचं स्वतःच एक प्रोडक्शन हाऊस देखील ओपन केले आहे. अभिनेते आनंद काळे हे खऱ्या आयुष्यात एक मोठे बिजनेसमॅन आहेत. ते न्यू गणेश आर्ट या कंपनी मध्ये देखील पार्टनर आहेत. या मध्ये खूप साऱ्या प्रकारच्या गणेश मुर्त्या बनवल्या जातात. अभिनेते आनंद काळे याना फोटोग्राफीची देखील खूपच आवड आहे.

Title: Anand Kale as Kondaji Baba in Swarajya Rakshak Sambhaji

Tags: Anand Kale, Anand Kale Kondaji, Anand Kale Biography, Anand Kale actor, Anand Kale Wife, Anand Kale Hollywood, Anand Kale age, Anand Kale birthdate, Anand Kale serials, Anand Kale Educatio, Anand Kale Movies, Anand Kale as kondajibaba in swarajya rakshak sambhaji

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *