अंजली बाईंचे होणार दुसरे लग्न? मालिकेत येणार नवीन ट्विस्ट!

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जेव्हापासून राणा बेपत्ता झाला होता तेव्हापासून मालिकेने TRP मध्ये उच्चांक गाठला आहे. पुन्हा एकदा हि मालिका रंजक वळण घेणार आहे. राणा हा राजा राजगोंडाच आहे असं सर्वाना वाटत आहे आणि त्यामुळे अंजलीचे आई बाबा देखील असंच समजत आहेत. त्यामुळे अंजलीला  नंदिता आणि राजा खूप त्रास देत आहेत असं वाटत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आत्ता अंजलीचे आईवडील अंजलीचे दुसरे लग्न लावून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी घरी पाहुण्यांना देखील बोलावलं आहे. आदित्य म्हणजेच अंजलीचा लहानपणीच मित्र याच्यासोबत लग्न करून देण्यासाठी अंजिलींचे वडील खटाटोप करत आहेत. आदित्यची भूमिका अभिनेता विकास पाटील साकारत आहेत. त्याने या पूर्वी वर्तुळ, लेक माझी लाडकी या मराठी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती तसेच शेंटिमेंटल, गडबड झाली या चित्रपटात देखील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आत्ता खरंच अंजली चे दुसरे लग्न होईल का? राणा अंजलीचे लग्न रोखण्यासाठी सत्य सर्वांसमोर आणेल का? या सर्व गोष्टी आपल्याला लवकरच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

Title: Anjali bai second marriage in Tuzhat Jiv Rangala – New Twist

Tags: anjali bai second marriage, new twist in tuzyat jiv rangala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *