Ankur Wadhave Engagement, Wedding, Marriage, Wife – Chala Hawa Yeu Dya

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा मराठी कॉमेडी शो प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या शो मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांची कॉमेडी पाहून प्रेक्षक खूप हसतात.

या कॉमेडी शो मध्ये अंकुर वाढवे हा कलाकार देखील आपल्याला दिसतो. अंकुर वाढवे याची उंची कमी आहे परंतु त्याची भूमिका पाहून प्रेक्षक पोट धरून हसतात. काही दिवसांपूर्वीच सिम्बा ची संपूर्ण टीम चला हवा येऊ द्या च्या सेट वर आपण पाहिली, त्यावेळी देखील अंकुर वाढवेने आपल्या कॉमेडी ने प्रेक्षकांना खूप हसवलं.

अंकुर वाढवेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे अंकुर वाढवे आत्ता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ४ जानेवारी रोजी अंकुरने आपल्या साखरपुड्याचे काही फोटो सोसिअल मीडिया वर शेअर केले आहेत. चाहत्यांनी देखील अंकुर ला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आत्ता लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे. तर मित्रानो तुम्ही किती उत्सुक आहात, अंकुर वाढवेच  लग्न पाहण्यासाठी ते कंमेंट करून नक्की सांगा.

Ankur Wadhave Wedding Pics:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *