अनुष्का सरकटे बद्दल बरंच काही

Title: Anushka Sarkate Biography, Wikipedia, Birthday, Age, Qualification, Education, Family, Boyfriend, Movies, Serials

२ नोव्हेंबेर पासून झी मराठी वरील ”कारभारी लाईभारी ” या मालिकेतून प्रियंका म्हणजेच अनुष्का सरकटे आपल्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत प्रियंकाची मुख्य भूमिका अनुष्का सरकटे हिने साकारली आहे. तर आज आपण अभिनेत्री अनुष्का सरकटे हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

अनुष्काचा जन्म ७ नोव्हेंबेर १९९४ रोजी औरंगाबाद येथे झाला असून तीच बालपण देखील तिथेच गेल . तिने तिच्या इंजीनीरिंग च शिक्षण गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनीरिंग ह्या कॉलेज मधून पुर्ण केल आहे . तीला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती म्हणूनच मास्टरिंग कम्प्युटर सायन्स शिक्षण घेत असतानाच तिने मास्टरिंग थिएटर आर्ट च देखील शिक्षण घेतल . त्यानंतर ४ वर्ष तिने विविध नाटकांमद्धे देखील काम केल . त्यातच ती अभिनेत्री होण्याच स्वप्न उराशी बाळगून मुंबई ला गेली आणि तिच्या पदरात सोनी मराठी वरील ‘’मी तुझीच रे ‘’ही मालिका पडली . ह्या मालिकेत दिव्या नावच पात्र साकारण्याची संधी तीला मिळाली.

त्यानंतर अनुष्का ला colours मराठी वरील ‘’श्री लक्ष्मीनारायण’’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी तीला मिळाली . ह्या मालिकेत तिने लक्ष्मी देवीच पात्र साकारल होत . तिच्या ह्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. आता अनुष्का आपल्याला झी मराठी वरील ‘’कारभारी लाईभारी ‘’हया मालिकेतून प्रियंकाची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारताना दिसत आहे.

तर मित्रांनो कारभारी लय भारी मालिकेतील अनुष्का सरकटे हिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Anushka Sarkate, Anushka Sarkate Biography, Anushka Sarkate Wikipedia, Anushka Sarkate Birthday, Anushka Sarkate age,anushka sarkate family, anushka sarkate boyfriend, anushka sarkate movies, anushka sarkate serials

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *