विनोद तावडेंनी काँग्रेस मध्ये यावं, मी तिकीट देतो – अशोक चव्हाण

अशोक चव्हाणांचा विनोद तावडेंना खोचक टोमणा

काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना हार पत्करावी लागली होती. त्यावेळी भाजपचे नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हटले होते कि, अशोक चव्हाण यांनी आता निवडणूक लढवू नये. असा सल्ला त्यांनी दिला होता. पण चव्हाणांना सल्ला देणारे विनोद तावडेंना यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट भाजपनं नाकारलं.

यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पलटवार केला. अशोक चव्हाण म्हटले, ‘ विनोद तावडेंसोबत नियतीने खूप मोठा खेळ केला. आता त्यांनी लवकर काँग्रेसमध्ये यावं, मी त्यांना तिकीट देतो ‘. अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विनोद तावडेंला टोमणा मारला.

पाठीमागच्या निवडणुकीमध्ये विनोद तावडे बोरिवलीमधून निवडून आले होते. मात्र, यावेळी भाजपनं त्यांना तिकीटच दिल नाही. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका मंडळी होती. बोरिवली मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे हे निवडणूक लढवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *