अशोक फळदेसाईची खरी जीवन कहाणी

अशोक फळदेसाई एक अभिनेता आहे, जो साधारण टेलिव्हिजनवरती काम करतो. अशोकचा जन्म गोव्यामध्ये झाला आणि त्याच बालपणही गोव्यातच गेलं. त्याच शालेय शिक्षण गोव्यातील गव्हर्नमेंट हाय स्कूल मधून झालं. त्यानंतर त्याने मलिकार्जून कॉलेज मधून बॅचलर ऑफ आर्टची पदवी घेतली. पुढे त्याने पुण्यामधील ललित कला केंद्रामधून थेटरमध्ये मास्टर्स पूर्ण केलं. त्याला व्यायामाची खूप आवड आहे म्हणून त्याची शरीरयष्टी मजबूत आहे. तो सध्या मुंबईमध्ये राहतो. त्याच लग्न अजून झालेलं नाही.

अशोक ने अजूनपर्यंत टेलिव्हिजनवर काम केलेलं नव्हतं. कलर्स मराठी या चॅनेलवरती चालू असलेल्या जीव झाला येडा पिसा या मालिकेतून त्याने टेलिव्हिजनवर आपलं पदार्पण केलं. जीव झाला येडा पिसा या मालिकेत तो शिव नावाची मुख्य भूमिका साकारतोय. हे पात्र साकारण्यासाठी त्याने १०-१२ किलो वजन वाढवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या मालिकेतील भाषा ही कोल्हापुरी आहे आणि अशोक मूळचा आहे गोव्याचा. त्यामुळे या मालिकेसाठी त्याला कोल्हापुरी भाषेवर सुद्धा मेहनत घ्यावी लागली. ही भाषा त्याने त्याच्या मित्राकडून शिकली.

अशोक सोबत मुख्य भूमिकेत विदुला चौगुले ही अभिनेत्री काम करत आहे. दोघांचाही अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *