खऱ्या आयुष्यातील बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील तात्याची बायको आहे खूपच सुंदर!

बाळुमामाच्या नावानं चांगभलं हि मालिका पौराणिक कथेवर आधारित असून संत बाळूमामा यांचा लहानपणी पासूनचा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील कलाकार नवीन आहेत परंतु आपल्या कामाची छाप त्यांनी रसिक प्रेक्षकांवर पाडली. संत बाळूमामा यांची भूमिका सुमित पुसावळे साकारत असून कोमल मोरे बाळूमामांची पत्नी सत्यवाची भूमिका साकारत आहे.

या मालिकेतील नावाजलेली एक भूमिका आहे आणि ती म्हणजे तात्याची. तात्याचं अजून लग्न झालेलं नाही म्हणून तो नेहमी पंचांच्या मागेपुढे करत असतो कारण पंचानी त्याला आपण तुझं लग्न करून देऊ असं सांगून त्याच्याकडून खूप सारी कामं करून घेतली आहेत. तर आज आपण तात्याची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय ताक याच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

अक्षय ताक हा मूळचा पैठणचा परंतु आत्ता तो मुंबई मध्ये राहत आहे. मुंबई मध्ये फिल्म सिटी असल्यामुळे सर्व ऍक्टर मुंबईतच राहत आहेत. अक्षयने आपले शालेय शिक्षण आस्वाद प्राथमिक शाळा आणि श्रीनाथ हायस्कूल पैठण येतुन पूर्ण केले.

नंतर त्याने अकॅडेमि ऑफ थेटर आर्ट्स मुंबई येथे अभिनयाचे धडे गिरवायला सुरवात केली. काही दिवस त्याने मराठी नाटकात कामं करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याला बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत तात्याची भूमिका साकारायची संधी मिळाली. अक्षयने तात्याच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे.

मालिकेतील तात्याचं जरी लग्न झालं नसलं तरी खऱ्या आयुष्यातील तात्याची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय ताक याचा साखरपुडा ११ ऑगस्ट २०१९ रोजी झाला आहे. लवकरच अक्षय विवाहबंधनात देखील अडकणार आहे. त्याच्या फॅमिली मध्ये त्याचे वडील सोमनाथ ताक, आई मीनाक्षी ताक आणि भाऊ अभय ताक हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *