अभिनेत्री भाग्यश्री लिमये या अभिनेत्याला करते डेट

घाडगे अँड सुन ह्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता भूषण प्रधान यांचा एक फोटो सोशल मीडिया वर वायरल झालाय. नुकताच ७ नोव्हेंबेरला भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या दिवशी भूषण प्रधानने लिहिलेली पोस्ट चर्चेला कारण ठरली तर यासोबतच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

नुकताच भाग्यश्रीने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिवशी भूषणने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. भाग्यश्री सोबतचा फोटो पोस्ट करत भूषणने लिहिलं ,’मी किती खास आहे याची जाणीव तु  मला नेहमी करून देते. तुझे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तु जशी आहेस तशीच राहा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ भूषणने दिलेल्या या शुभेच्छांवर भाग्यश्री सुद्धा व्यक्त झाली आणि तू नेहमीच माझा वाढदिवस खास बनवतो,  अशी तिने प्रतिक्रिया दिली. याआधी देखील या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडिया वर होत्या. भाग्यश्री ” घाडगे अँड सुन” या मालिकेतून घराघरात पोहोचली , तर भूषणला आपण  ‘आम्ही दोघी ,कॉफी आणि बरचं काही, टाइमपास,  टाइमपास २ अशा चित्रपटांमद्धे पाहिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *