बिग बॉस विजेता शिव ठाकरे बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही आश्चर्यकारक गोष्टी!

शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठी २ चा विजेता – Bigg Boss Marathi Season 2 Winner – Shiv Thakare

गेल्यावर्षीपासून बिग बॉस मराठी हा रिऍलिटी शो मराठी मध्ये सुरु झाला आणि तो खूपच प्रसिद्ध झाला. आत्ता ‘बिग बॉस मराठी २ संपला आणि सर्वांना ज्याची आतुरता असते ती म्हणजे फायनलची. सर्वजण आपापल्या स्पर्धकाला विजेता पाहत असतात. ‘बिग मॉस मराठी सीजन २ मध्ये देखील असंच काहीस चित्र आपल्याला पाहायला मिळालं.


बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक होते त्यातून सर्वात शेवटी असणारा स्पर्धक आरोह वेलणकर सर्वात पहिल्यांदा घराबाहेर पडला. त्यानंतर किशोरी ताई घराबाहेर पडल्या. किशोरी ताई बाहेर पडल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर शिवानी आणि शिवानी नंतर वीणा देखील घराबाहेर पडली. घरात फक्त दोनच स्पर्धक उरले होते ते म्हणजे शिव आणि नेहा. शिव आणि नेहा टॉप २ मध्ये पोहोचले आणि त्यांच्यामधून शिव हा बिग बॉसचा विनर झाला आहे.


बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांपेक्षा शिव हा खूपच स्ट्रॉंग होता. इतर सर्व स्पर्धकांपुढे शिव ला खूपच जास्त मत मिळाल्यामुळे तो शेवटी बिग बॉसची ट्रॉफी जिंकला. शिव ने आरोह सोडून इतर कोणत्याही स्पर्धकांसोबत कधीही भांडण केलं नाही. शिव जेव्हा आरोहाला चावला होता तेव्हा त्याने आरोहाची माफी देखील मागितली होती. त्यामुळे शिव रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. शीवच्या या सर्व चांगल्या गुणांमुळेच आज तो ‘बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता झाला आहे.

शिव ठाकरे याच्या जवळचा किंवा कुटुंबातील कला क्षेत्रात काम करणारा असा कोणताही वारसा नव्हता, परंतु शिवने कधीही असा विचार केला नाही कि आपलं कोणीही सिनेसृष्टीत ओळखीचं नाही मग आपण या क्षेत्रात कसं जायचं. त्याने या क्षेत्रात येण्यासाठी खूपच मेहनत घेतली. खूप वेळेस त्याला अशा रिऍलिटी शो मध्ये नाकारलं देखील गेलं. परंतु त्याने आपलं ध्येय सोडलं नाही आणि तो लढत राहिला.


MTV वरील rodies साठी देखील त्याने खूप वेळेस ऑडिशन दिले. खूप सारे ऑडिशन दिल्यानंतर तो MTV Rodies साठी सिलेक्ट झाला आणि तेथून त्याचा खरा प्रवास सुरु झाला. MTV Rodies मध्ये असताना त्याच अफेयर श्वेता मेहता या MTV Rodies मधील एका स्पर्धकासोबत होत असं बोललं जात होत. या रिऍलिटी शो मध्ये तो टॉप मध्ये होता.


नंतर त्याने स्वतःची डान्स अकॅडेमि सुरु केली. शिवला डान्स देखील खूप आवडतो. बिग बॉस साठी देखील त्याने खूप वेळा प्रयत्न केला मग तो हिंदी बिग बॉस असो किंवा मराठी असो. शेवटी तो मराठी बिग बॉस मध्ये आला आणि ट्रॉफी जिंकून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *