Boyz 2 Movie Review – Parth Bhalerao, Sumant Shinde, Pratik Lad

Boyz 2 Movie Review – Parth Bhalerao, Sumant Shinde, Pratik Lad

पहिला बॉईज हा चित्रपट खूप गाजला होता, प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होत. बॉईज २ हा चित्रपट देखील तितकाच प्रेक्षकांना आवडेल याची याची खबरदारी चित्रपट बनवणाऱ्यानी आणि चित्रपटातील कलाकारांनी घेतली आहे. बॉईज २ हा अडल्ट कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात ढुंग्या म्हणजेच पार्थ भालेराव, धैर्या म्हणजेच प्रतीक लाड आणि कबीर म्हणजे सुमंत शिंदे हे तिघेजण बारावीत आहेत.
त्यांचा सिनिअर नऱ्या याच्यासोबत यांचं वाकड येत. त्यामुळे सतत ढुंग्या आणि धैर्या यांची त्याच्यासोबत भांडण होत असतात. त्यामुळे कबीर ढुंग्या आणि धैर्या पासून लांब राहायचं ठरवतो, परंतु कॉलेज मध्ये नवीन आलेली मुलगी चित्रा म्हणजेच सायली पाटील हि मुलगी कबिरला खूप आवडत असते. म्हणून कबीर पुन्हा हॉस्टेल मध्ये राहायला येतो.
तिघेजण एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात सतत भांडण होत असतात. ते तिघेजण एक पैज लावतात आणि जो पैज पूर्ण करू शकणार नाही त्याला कॉलेज सोडून जावं लागणार असत. पैज नेमकी काय आहे, या पैज मुले पुढं नेमकं काय घडत ते तुम्हाला चित्रपट पाहून कळेलच.
बॉईज २ हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असल्यामुळे त्यातील संवाद देखील डबल मिनिंग आहेत. या चित्रपटात सुमंत शिंदे, प्रतीक लाड आणि पार्थ भालेराव यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली भूमिका साकारली आहे. या चित्रपट मारामारी आणि दोन गटातील खुन्नसपणा दाखवण्यात आला आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं देखील दाखवलं आहे. पोर्नोग्राफी मुळे मुले कशी चुकीच्या मार्गाला लागतात ते दाखवले आहे.
गिरीश कुलकर्णी यांची छोटीशी भूमिका तितकीच लक्षात राहते. एकंदरीत सांगायचं झालं तर हा चित्रपट मस्त आहे.

Tags: Boyz 2, Boyz 2 movie, Boyz 2 Movie Review, Boyz 2 Marathi Movie Review,Boys 2 Movie Cast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *