स्वामिनी मालिकेतील चिन्मय पटवर्धन बद्दल बरंच काही!

चिन्मय पटवर्धनची संपूर्ण माहिती:

चिन्मय पटवर्धन हा अभिनय क्षेत्रात नवीन चेहरा आहे. त्याचा जन्म पुण्यामध्ये झाला आणि त्याच बालपण ही पुण्यात गेलं. त्याने काही मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. हॉस्टेल डेज, सूर सपाटा या काही चित्रपटामध्ये त्याने भूमिका साकारली आहे. हॉस्टेल डेज या चित्रपटामध्ये त्याने छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने सूर सपाटा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका म्हणजेच पूर्णाची भूमिका केली होती. यामध्ये त्याने कब्बडी खेळाडूची भूमिका केली होती आणि कब्बडी संघाचा तो कर्णधार होता.  

चिन्मयने वर्तुळ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. त्याने भूमिका या नाटकामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चिन्मयने याआधी टेलिव्हिजनवर काम केलेलं नव्हतं. पण चिन्मयने कलर्स मराठी वरील स्वामीनी या नव्या मालिकेतून टेलिव्हिजन वर आपलं पदार्पण केलं. स्वामीनी या मालिकेत तो माधवराव पेशवे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत सृष्टी पगारे आहे आणि ऐश्वर्या नारकरही आहे.

 Tags: chinmay patwardhan, chinmay patwardhan biography, chinmay patwardhan wiki, chinmay patwardhan birth date, chinmay patwardhan age, chinmay patwardhan actor, chinmay patwardhan pune, chinmay patwardhan movie, chinmay patwardhan family, chinmay patwardhan Wikipedia, chinmay patwardhan in swamini serial, चिन्मय पटवर्धन, चिन्मय पटवर्धन माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *