दगडी चाळ २ लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला – Dagdi Chawl 2 Latest Update

मराठी चित्रपट सृष्टीत आत्ता सुपरहिट चित्रपटांचे sequal बनवायची प्रथा सुरु झाली आहे. संगीता अहिर प्रदर्शित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ हा मराठी चित्रपट २ ऑक्टोबर २०१५ रोजी रिलीज झाला. हा चित्रपट दगडी चाळ मध्ये राहणाऱ्या एका डॉन वर आधारित आहे. गॅंगवॉर हा जरी या चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले होते. हळुवार फुलत जाणारी प्रेमकहाणी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

दगडी चाळ या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंतने तर अभिनेता अंकुश चौधरीने मुख्य भूमिका साकारली होती. आत्ता या चित्रपटाचा sequal येत आहे. याचा sequal येणार असल्याचं सर्वानाच माहित होत परंतु आत्ता खुद्द अभिनेत्री पूजा सावंतने दगडी चाळ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. संगीता अहिर प्रदर्शित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दगडी चाळ २ मध्ये अभिनेत्री पूजा सावंत पुन्हा एकदा आपल्याला दिसणार आहे परंतु अंकुश चौधरी या चित्रपटात दिसणार कि नाही ते अजून गुलदस्त्यातच आहे. कारण अंकुश चौधरीचा एक नवीन चित्रपट ट्रिपल सीट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे अंकुश चौधरी या चित्रपटात दिसणार कि नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *