अंबानी आणि अदानी यांची डोळे फिरतील एवढी संपत्ती – फोर्ब्जने नवी यादी जाहीर केली

अंबानी आणि अदानी यांची डोळे फिरतील एवढी संपत्ती – फोर्ब्जने नवी यादी केली जाहीर

फोर्ब्ज नावाची आंतरराष्ट्रीय संस्था ही दरवर्षी जगातील आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करत असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फोर्ब्जने ही यादी जाहीर केलेली आहे. ही यादी भारत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची आहे. या यादीमध्ये प्रथम स्थानी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे आहेत. फोर्ब्जने जरी केलेल्या यादीनुसार गौतम अदानी यांनी आठ स्थानाची झेप घेत दुसरा क्रमांक मिळवला.

फोर्ब्जने दिलेल्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर म्हणजेच ३ लाख ७० हजार कोटी इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेले अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ही १५.७ बिलियन डॉलर इतकी आहे.

अंबानी आणि अदानी यांच्याशिवाय सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहा मध्ये यांची नवे आहेत हिंदुजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, कोटक बँकेचे उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील शिव नादार, राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबीय, लक्ष्मी मित्तल, बिर्ला कंपनीचे कुमार बिर्ला, अशी यादी फोर्ब्जने जाहीर केलेली आहे. ��@�

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *