Gayatri Datar Marathi Actress – Wiki, Biography, Images, Tula Pahate Re

Gayatri Datar Marathi Actress – Wiki, Biography, Images, Tula Pahate Re

सुबोध भावे यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली की “दुनिया गोल हैं” काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी “तुला पाहते रे “ च्या सेट वर तिची गाठ पडली आणि तिनी मला ह्या प्रसंगाची आठवण करून दिली . मी थक्क!!!!!!! ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती “इशा” म्हणजेच “गायत्री दातार” स्वप्नांवरचा माझा विश्वास अजूनच वाढला. अभिनेत्री गायत्री दातार लहान असताना सुबोध भावे यांनी आपल्या हाताने गायत्री ला पुरस्कार दिला होता. तेव्हा त्या लहान मुलीने अभिनेता सुबोध भावे यांच्या सोबत काम करायची इच्छा व्यक्त केली होती आणि आज प्रत्यक्ष तो दिवस आला.

तुला पाहते रे या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार, सुबोध भावे सोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत आहे. या मालिकेत प्रेम करणारी व्यक्ती ही कधीच श्रीमंती, जात, धर्म, घर, कुटुंब किंवा वय पाहून त्यावर प्रेम करत नाही असं दाखवण्यात आलेलं आहे. पुरस्कार देताना गायत्री दातार ही अभिनेत्री ही खूपच लहान होती, पण आज तिने आपल्या जिद्दीने आणि कष्टाने जे साध्य करून दाखवले आहे त्यामुळे ती आज खूप खुश आहे. तुला पाहते रे या मालिकेत आज गायत्री, सुबोध भावेच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. गायत्री दातार सारख्या मराठमोळ्या अभिनेत्रीला आमच्याकडून तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

 

 

Tags: Gayatri Datar, Gayatri Datar Biography, Gayatri Datar real age, Gayatri Datar age, Gayatri Datar tula pahate re, Gayatri Datar family, Gayatri Datar boyfriend, Gayatri Datar serial, Gayatri Datar images, Gayatri Datar birthdate, Gayatri Datar in tula pahate re, isha in tula pahate re

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *