Girija Prabhu Biography, Wiki, Birthday, Age, Qualification, Height, Weight, Family, Husband, Boyfriend, Salary, Movies, Serials

Girija Prabhu Biography, Wiki, Birthday, Age, Qualification, Height, Weight, Family, Husband, Boyfriend, Salary, Movies, Serials

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकरणी सारखी काम करत असते. तिला त्या घरातील लोक नेहमी घालून पाडून बोलत असतात. परंतु काहीजण तिला आदर देखील दाखवत आहेत. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. तर आज आपण सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मुळची गोव्याची असून तिचा जन्म 27 नोवेंबर 2000 साली झाला. परंतु ती लहाणाची मोठी पुण्यात झाली. आत्ता ती फक्त 20 वर्षांची आहे. गिरिजा ने आपले शालेय शिक्षण पुण्यातील PDEA’s English Medium School मधून पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातील आबासाहेब गरवारे या कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतले. आत्ता ती या कॉलेज मध्ये B.A करत असून Third Year मध्ये शिकत आहे. शूटिंग करत करत ती आपल्या शिक्षणाकडे देखील लक्ष देत आहे.

गिरिजाच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू असून ते आत्ता निवृत्त झाले आहेत आणि आईचे नाव गौरी असून त्या हाऊस वाइफ आहेत. गिरीजाला लहानपणापासूनच डांसची खूप आवड आहे. शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात तिने खूप साऱ्या डांस स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय तिने डांस इंडिया डांस, महाराष्ट्राचा डांसिंग सुपर स्टार आणि युवा डांसिंग क्वीन यांसारख्या डांस रीयालिटि शो मध्ये देखील भाग घेतला होता.

डांस सोबत तिला अभिनयाची देखील आवड आहे. गिरिजाने या पूर्वी विठु माऊली, अंजली, जय मल्हार, क्राइम डायरी, लक्ष्य यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने कौल मनाचा, काय झाल कळणा यांसारख्या चित्रपटांत देखील काम केले आहे.

परंतु गिरिजाला खरी ओळख मिळाली ती सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमुळे. या मालिकेत तिला गौरीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेतील गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या टाइटल सोंग ने तर प्रेक्षकांना अगदी वेड करून सोडल होतं. अभिनेत्री गिरिजा प्रभू हिच्या भावी आयुष्यासाठी Team AtoZ Marathi कडून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतोय ते कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद.

Girija Prabhu Photos

Tags: Girija Prabhu Biography, Girija Prabhu Age, Girija Prabhu Sukh Mhanje Nakki Kay Asta, Girija Prabhi Birthday, Girija Prabhu Photos, Girija Prabhu Husband, Girija Prabhu Boyfriend, Girija Prabhu Family, Girija Prabhu Qualification

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *