Kiran Dhane After Leaving Lagira Zhala ji

लागीर झालं जी या मालिकेत जरी शीतल आणि अजिंक्य मुख्य भूमिकेत असले तरी जयडी, भैय्या, राहुल्या देखील या मालिकेचे तितकेच महत्वाचे कलाकार आहेत. त्यांच्याशिवाय या मालिकेत रस नाही. कमी मानधन मिळत असल्याच्या कारणावरून जायडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किरण ढाणे आणि फेडरेशन अध्यक्ष पुष्पा मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या सावळे यांनी मालिका सोडली. या दोघींची जागा दोन नव्या कलाकारांनी घेतली आहे. पण पूर्वी काम करत असलेली जायडी आणि मामी याना प्रेक्षक खूप मिस करत आहेत.

अभिनेत्री किरन ढाणे हिने मालिका सोडल्यानंतर आत्ता ती एका नवीन चित्रपटात काम करत आहे. पळशीची पिटी या चित्रपटात किरण ढाणे ची भूमिका तुम्हाला पाहायला मिळणार आहे.हा चित्रपट ऑक्टोबर २०१८ मध्ये आपल्याला चित्रपट गृहात पाहायला मिळेल. शिवाय तुमची सर्वांची आवडती अभिनेत्री किरण ढाणे आत्ता मॉडेलिंग देखील करत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे मॉडर्न फोटो देखील शेअर केले आहेत. तिचे हे मॉडर्न फोटो पाहून असं वाटत आहे कि ती नवीन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आत्ता मॉडेलिंग करत आहे. तिने लवकरात लवकर छोट्या पडद्यावर पुन्हा आगमन करावं अशी सर्वांची इच्छा आहे. तर मित्रानो तुम्हाला काय वाटत ते कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Tags: Kiran Dhane recent news, Kiran dhane, Jayadi in lagira zhala ji, Lagir zal ji, Kiran dhane hot, kiran dhane modern photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *