निवडणूक आयोगाकडे मनसेची ‘राज’ गर्जना

निवडणूक आयोगाकडे मनसेची ‘राज’ गर्जना

एकविरा देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण राज साहेबाना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरवातीला पुण्यातील सभेला मैदान मिळत नव्हतं. मैदान मिळालं कसबस तर काल पुण्यामधील सभेला राज साहेब गरजण्याआगोदर पावसाने थैमान घातले. त्यामुळे कालची कसबा येथील सभा रद्द करावी लागली. मैदानवर अक्खा चिखल होता. त्यामुळे प्रचार सभा रद्द झाली. त्यामुळे मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रुखरुख लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसोबत पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सगळ्या राजकीय नेत्यांचीही चिंता वाढली आहे. जोरदार पाऊस पडल्यामुळे मैदानामध्ये खूप चिखल होत आहे. या सगळ्याचा विचार करून मनसेने रस्त्यांवर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली. कारण हवामान खात्याने २० ते २१ आक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आणखी सभांचा सत्यानाश होऊ नये म्हणून मनसेने निवडणूक आयोगाकडे रस्त्यांवर सभेंची परवानगी मागितली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *