खऱ्या आयुष्यातील बबन्याला पाहून तुम्ही पण थक्क व्हाल!

मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील खऱ्या आयुष्यातील बबन्याला पाहून तुम्ही पण थक्क व्हाल!

काही दिवसांपूर्वीच लागीर झालं जी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला, परंतु या मालिकेच्या ठिकाणी मिसेस मुख्यमंत्री हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. लागीर झालं जी या मालिकेप्रमाणे मिसेस मुख्यमंत्री हि मालिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

विशेष म्हणजे मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील अतरंगी बबन्या हे कॅरॅक्टर प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे. बबन्याची कॉमेडी पाहून प्रसिक प्रेक्षक देखील खदखदून हसतात. तर आज आपण जाणून घेऊयात कि मिसेस मुख्यमंती या मालिकेत बबन्याची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित चव्हाण याच्याबद्दल.

रोहित हा मूळचा कराड मधील हिंगनोळे गावचा. त्याने आपले शालेय शिक्षण कराड मधील न्यू इंग्लिश स्कूल इंदोली येथून पूर्ण केले त्यानंतर गाडगे महाराज कॉलेज मधून त्याने उच्चशिक्षण पूर्ण केले. रोहितला कलाक्षेत्रात खूपच रस होता. कॉलेज मध्ये असताना त्याने खूप सारे नाटक केले आणि बक्षीस देखील जिंकले. काळूबाईच्या नावानं चांगभलं या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदा मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.

अचूक अशी कॉमेडी टाईमिंग असल्यामुळे त्याने झी मराठीवरील कॉमेडी शो असलेल्या हास्य सम्राटच्या दुसऱ्या पर्वात उपविजेतेपद पटकावले आणि कलर्स मराठीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या शो मधून त्याने सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. बॉईज २, झाला बोभाटा, जोगवा, पांगिरा, चूकभूल, सुपरस्टार, बळीराजाचं राज्य येऊ दे, बाबा लगीन यांसारख्या खूप साऱ्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

रोहित चव्हाण याने खूप सारे मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शोमध्ये काम करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tags: Mrs Mukhyamantri fame Rohit Chavan, Babanya real name in mrs mukhyamantri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *