मुंडे बहीण-भावाच्या जीविताला धोका

मुंडे बहीण-भावाच्या जीविताला धोका

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि पक्षांच्या प्रचाराची तयारी सुरु झाली. यादरम्यान उमेदवारांना धमक्यांचे फोन येतात. हे कोण करत याचा मात्र तपास लागत नाही. नुकतंच शरद पवार यांनी देखील एक विधान केलं होत कि, निवडणुकी दरम्यान उमेदवार गायब होतात. पालघर मधील संदर्भ देत शरद पवार म्हटले होते कि, पालघर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुद्धा गायब केले गेले होते. अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली ती म्हणजे मुंडे बंधू-भगीनींची सुरक्षा डोख्यात आल्याची.

परळी मतदार संघातून गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजाताई मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने उतरलेले आहेत. ही लढत नेहमीच चुरशीची असते. सध्याच्या निवडणुकीतही ही लढत रंगतदार असणार आहे असं काही जाणकारांचं मत आहे. पण या मतदार संघातील उमेदवारांना धोका असल्याचे गुप्त वार्ताहराकडून समजते.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावाच्या जीविताला धोका असल्याचा अहवाल गुप्त वार्ताहराने गृहमंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे या मतदार संघामध्ये चिंतेचे वातावरण झालेले आहे. प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांच्याभोवती आता हत्यारबंद फौज असणार आहे, असं समजत.   r����*w]F

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *