Naal Movie Review in Marathi | नाळ

लहान मुले आपल्या विश्वात जगत असतात, त्यांना फक्त आपल्या आईवडिलांची, मायेची उब हवी असते. आपल्या आईवडिलांनी आपल्याला दत्तक घेतले आहे हे समजल्यानंतर मुलांची काय हालत होते हे नाळ या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे.

चैत्या एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासोबत राहत असतो. त्याचे आई, वडील आणि आजी चैत्याचे खूप लाड करत असतात. त्याला मित्रांसोबत खेळायला खूप आवडतं. पण एक दिवस त्याच्या घरी त्याने कधीच न पाहिलेला मामा येतो आणि त्याला कळतं कि आपल्या आईवडिलांनी आपल्याला दत्तक घेतलं आहे. आपले खरे आईवडील हे नसून दुसरेच कोणीतरी आहेत. हे कळल्यानंतर चैत्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी खूप चांगल्या पद्धतीने चित्रपटात मांडली आहे.

नाळ या चित्रपटाचे लोकेशन रिअल आहेत आणि सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे कि हा चित्रपट तुम्हाला चित्रपट गृहात पाहण्यात वेगळीच मज्जा वाटेल. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे यांनी आपल्या भूमिका अतिशय चोखपणे पार पडल्या आहेत. सुधाकर रेड्डी यांची दिग्दर्शन करण्याची पाहीची वेळ असल्याचं या चित्रपटात अजिबात जाणवत नाही.चित्रपटातील संवाद देखील अप्रतिम आहेत. जाऊ दे नं व… हे गाणं प्रेक्षकांना ऐकायला खूपच आवडतं.

सुरुवातीला हा चित्रपट थोडासा संथ वाटतो परंतु प्रेक्षकांना हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चित्रपटात सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय केला आहे. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने प्रेक्षकांना खूप चांगला संदेश दिला आहे. माझ्या मते हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

जर तुम्ही नाळ हा चित्रपट अगोदरच पहिला असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला ते नक्की लिहा.

 

Tags: Naal Movie Review in Marathi, Naal Movie Review, Naal Movie, Naal, Nagraj Manjule movie, नाळ, नाळ चित्रपट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *