कीर्ती जीजी अक्काचा राग दूर करणार?

फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या आजच्या भागात जीजी अक्का शुभम आणि कीर्ती सोबत परकेपणानेच वागतात. जीजी अक्का शुभमला बोलतात जेव्हा मला कळलं तू माझ्यासॊबत पहिल्यांदा खोटं बोलला आहे, तेव्हा मला असं वाटलं तू माझा शुभम नाही दुसराच कोणीतरी आहे.  तेव्हा तुला वाटलं तस वागलास ना तू, मग आता मला जस वाटतंय तस वागूदे मला पण.   कीर्ती घरातली कामे करायला जाते पण त्या तिला करू देत नाहीत. शुभमला जीजी अक्कांच्या जुन्या आठवणी आठवत असतो. शुभम दाढी करत असतो आणि तो मुद्दाम स्वतःला ब्लेड लावून घेतो. घरातले सगळे तिथे असतात. भिंगरी शुभम साठी मलम घेऊन येते आणि जीजी अक्कांना शुभमच्या जखमेवर लावायला सांगते. पण जीजी अक्का लावत नाहीत, त्या बोलतात मालकीण बाई आहेत ना मलम लावायला त्यांनी मलम लावला तर लवकर बरं होईल. कीर्ती मनातल्या मनात बोलते शुभमला हा मलम तर जीजी अक्कांनीच लावला पाहिजे, म्हणून ती भिंगरी कडून तो मलम घ्यायला जाते आणि बोलते हे औषध खूप गरम आहे मला नाही लावता येणार हे औषध. ती जीजी अक्कांना लावायला सांगते. जीजी अक्का शुभमच्या जवळ जातात आणि त्याच्या गळ्यातला टॉवेल काढून कीर्तीला देतात आणि बोलतात, या टॉवेल मध्ये औषध ठेवा आणि लावा म्हणजे हाताला चटका नाही बसणार तुमच्या.         

जीजी अक्कांच्या अश्या वागण्यामुळे शुभमला खूप वाईट वाटत. कीर्ती औषध घेऊन शुभमला लावायला जाते पण शुभम नाही लावून घेत. तो तिथून निघून जातो. जीजी अक्का मंदिरात जाण्यासाठी निघतात. भाऊ जीजी अक्कांना बोलतात, शुभम सोबत असं वागून तुला काय मिळणार आहे.  शुभम रूम मध्ये बसलेला असतो तिथे कीर्ती औषध घेऊन येते आणि शुभमला लावते. ती शुभमला बोलते, थोडा वेळ जाऊद्यात जीजी अक्का राग विसरतील, मी त्यांना विसरायला लावेल.   

बाहेर सगळे नाश्ता करण्यासाठी बसले असतात, भाऊ बाजूला बसले असतात . कीर्ती त्यांना चहा देते पण ते घेत नाहीत. शुभम तिथे येतो आणि तुषारला कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे देतो जीजी अक्का  तुषार कडून पैसे घेते आणि कीर्तीला नेऊन देते. त्या कीर्तीला बोलतात, हे तुमच्या नवऱ्याने कमावलेले पैसे आहेत. या पैश्यावर सगळ्यात पहिला हक्क तुझा आहे. शुभमला पैसे जपून ठेवायला नाही जमत, तुम्ही शिकवा त्याला, त्याच्याकडे पैसे देऊ नका. त्यावर शुभम जीजी अक्काला बोलतो, मी हे पैसे तुषार च्या फी साठी दिले आहे. तर जीजी अक्का बोलतात त्याच्या फी ची काळजी तुम्ही नका करू. त्या विक्रम जवळ जातात आणि बोलतात, तू दुकानात जे पैसे कमवशील ते पैसे सोनालीकडे दे. तुम्ही सगळे खुश राहा आणि आप आपल्या बायकांची मने जपा. तुषारच्या फी साठी माझ्याकडे काटकसरीने जमा करून ठेवलेले पैसे आहेत आणि त्यात हि नाही भागलं तर लाकडे विकून भागवू.       

Tags: Phulala Sugandha Maticha Today 19 December  Episode

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *