स्वतःला गरीब म्हणणारे गोपीचंद पडळकर यांच्याकडे कोटीची संपत्ती

स्वतःला गरीब म्हणणारे गोपीचंद पडळकर यांच्याकडे कोटीची संपत्ती

वंचितांचा नेता म्हणून ओळखले जाणारे नेते गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. पवार घराण्याला ते टक्कर द्यायला निघालेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी घाम फोडला होता. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. आणि आता भाजपकडून ते बारामतीत लढत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून आपला अर्ज भरला आहे. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण पत्रही जोडलं आहे. त्यानुसार पडळकर यांच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं आढळून आलं.

विवरणपत्रात पाडळकरांनी शेतकरी असल्याचं नमूद केलं आहे. त्यांच्याकडे ६० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि २४ लाख रुपयाची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. त्यांनी ९५ हजार रुपयांची रोख रक्कम विवरण पात्रात लिहिली आहे. विविध बँकात १७ हजार रुपयांची ठेव आहे. त्यांच्याकडे ६० हजार रुपयांचे २० ग्राम सोन्याचे दागिने आहेत. आटपाडी मध्ये साडे तीन एकर जमीन, झरे इथे ६ एकर शेतजमीन आहे. बिगर शेतजमीन विटा येथे २८ लाख रुपयांची आहे. पडळकरवाडी इथे ३ लाख आणि झरे येथे ७ लाख रुपयांची स्वतःची घरे आहेत. अजूनपर्यंत पडळकर यांनी आयकर विवरण पत्र सादर केलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *