आमच्याकडे होता तेव्हा राम होता न तिकडं रावण झाला

आमच्याकडे होता तेव्हा राम होता न तिकडं रावण झाला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा सध्या जोराला लागल्या आहेत. यामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे पक्षप्रमुख काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे काय ‘राज’ गर्जना करणार याच वेध लागलं होत. राजसाहेबांच्या प्रचाराला दोन दिवसापासून सुरवात झाली आहे. कालच त्यांची घाटकोपर येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोठी गर्जना केली. या सभेत त्यांनी भाजपचे राम कदम यांच्यावर निशाणा साधला.

या सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले, आमच्याकडे होता तेव्हा राम होता आणि तिकडं गेल्यावर रावण झाला असं म्हटल्यावर एकच गर्जना झाली. या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधलं गेलं.

राम कदम यांनी खूप दिवसांपूर्वी एक विधान केलं होत कि, तुम्हाला कोणती मुलगी नाही म्हटली तर मला सांगा मी त्या मुलीला उचलून घेऊन येतो. या विधानावर त्यावेळी खूप हंगामा झाला होता. याच विधानावरून राजसाहेब ठाकरे यांनी राम कदम याना लक्ष्य करीत म्हटली कि, आमच्याकडे होता तेव्हा राम होता, तिकडं गेला न रावण झाला. यावरून त्यांनी भाजपाला देखील लक्ष्य केलं. ते म्हणाले, अशा माणसाला हा पक्ष तिकीट देतो कस काय. बहुमत असल्यावर असा माज दाखवला जातो असेही राजसाहेब यावेळी म्हटले.

या सभेमध्ये त्यांनी जनतेलाही खडसावले. त्यांनी जनतेला प्रश्न केला कि, तुमच्यात काही संवेदना शिल्लक आहे कि नाही अशी आर्त हाक घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *