Rajeshwari Kharat Biography, Wiki, Images, Family, Boyfriend, Movies, Fandry

Rajeshwari Kharat Biography, Wiki, Images, Family, Boyfriend, Movies, Fandry

नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट चांगलाच गाजला आणि या चित्रपटाला काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जातीवर आधारित असून त्यांच्यातली प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची शूटिंग अहमदनगर जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावात झाली आहे.

नागराज मंजुळे यांना शालूच्या भूमिकेसाठी, त्यांना पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती, परंतु काही दिवसानंतर त्यांना पुण्यात राजेश्वरी दिसली. त्यांनी शालूच्या भूमिकेसाठी राजेश्वरी खरातची निवड केली. राजेश्वरीच्या घरचा पत्ता शोधून त्यांनी तिच्या आईवडिलांना आणि राजेश्वरीला शालूच्या भूमिकेसाठी विचारणा केली, तेव्हा तिच्या घरच्यांनी देखील होकार दिला.

जेव्हा राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटासाठी काम सुरु केलं, तेव्हा ती नववीत होती. तिने तिचे शालेय शिक्षण जोग एजुकेशन ट्रस्ट पुण्यातून पूर्ण केले असून सिंहगड इन्स्टिटयूट मधून ती बी.कॉम करत आहे.

या चित्रपटात विशेष म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही, तरीही तिने तिच्या भूमिकेची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. या चित्रपटामुळे तिला विशेष अशी ओळख मिळाली. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाला अजूनही लोकं विसरले नाहीत.

फॅन्ड्री चित्रपटानंतर ३ वर्षांनी तिला २०१७ मध्ये आयटमगिरी या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. या चित्रपटात तिने हंसराज जगताप बरोबर काम केलं आहे. आत्ता ती अजून काही चित्रपटासाठी काम करीत आहे. राजेश्वरी खरात हि अभिनेत्री चित्रपटाचा कसलाही गंध नसताना अभिनय क्षेत्रात उतरली आहे. ती पुण्यात आपल्या आई वडिलांसोबत राहते. तिचे वडील बँकेत कामाला असतात. अभिनयाचा कसलाही वारसा नसताना तिने या क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.

फॅन्ड्री चित्रपट करताना ती खूपच लहान होती, परंतु आत्ता ती मोठी झाली असून पहिल्यापेक्षा पण ती आत्ता खूपच सुंदर दिसत आहे.

 

Tags: Rajeshwari Kharat, Rajeshwari Kharat Movie, Rajeshwari Kharat Biography, Rajeshwari Kharat images, Rajeshwari Kharat income,  Rajeshwari Kharat fandry movie, Rajeshwari Kharat boyfriend, Rajeshwari Kharat family, राजेश्वरी खरात, फॅन्ड्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *