फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री आत्ता दिसतेय खूपच सुंदर!

फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री आत्ता दिसतेय खूपच सुंदर!

फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून नावारूपास आलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. या चित्रपटात तिने शालूची भूमिका साकारली होती. फॅन्ड्री या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळला आहे. या चित्रपटात शालूचा आपल्याला एकही डायलॉग ऐकायला मिळत नाही. तिचे फक्त हावभावच सगळं काही सांगून जातात. तर आज आपण फॅन्ड्री या चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात बद्दल जाणून घेणार आहोत.

राजेश्वरीचा जन्म ८ एप्रिल १९९८ रोजी पुण्यात झाला. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील जोग एडुकेशन ट्रस्ट मधून पूर्ण केले असून आत्ता ती सिंहगड कॉलेज मध्ये B .SC मध्ये आपले graduation पूर्ण करत आहे. राजेश्वरीचे वडील बँकेत नोकरी करत असून आई Housewife आहे. राजेश्वरीने कधीच विचार केला नव्हता कि ती फिल्म इंडस्ट्री मध्ये येईल कारण तिचा आणि कलाक्षेत्राचा लांबलांब पर्यंत संबंध नव्हता. तिच्या कुटूंबातील कोणीच या क्षेत्रात उतरलेलं नव्हतं पण नशिबाने राजेश्वरी खरात एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री बनली.

२०१४ मध्ये फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाहिलं पाऊल टाकलं. या चित्रपटात तिने शाळेतील मुलगी शालूची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा एकही डायलॉग नसताना देखील तिने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्याच चित्रपटामुळे ती खूप लोकप्रिय बनली.

फॅन्ड्री चित्रपटासाठी मेकर्स शालूच्या भूमिकेसाठी एक लहान मुलगी शोधत होते तेव्हा त्यांना पुण्यात राजेश्वरी दिसली आणि त्यांनी तिच्या घरचा पत्ता शोधून तिला चित्रपटात काम करण्यासाठी तिच्या आई वडिलांना राजी केलं. राजेश्वरीचा खरा प्रवास सुरु केला तो फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून आणि तिचे नशीबच बदलले. नंतर २०१७ मध्ये तिचा आयटम गिरी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धमाल गाजवू शकला नाही.

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिच्या राहणीमानात देखील खूपच बदल झाला आहे आत्ता ती खूपच मॉडर्न झाली असून अतिशय सुंदर दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *