Rajpal Yadav Jailed for Three Months | राजपाल यादवला तीन महिने तुरुंगवास

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला चेक बाऊन्स प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.राजपाल यादवला न्यायालयाने तडजोडीची रक्कम याचिकाकर्त्यांना द्यायला सांगितली होती.

परंतु राजपाल यादव हि रक्कम देऊ शकले नाहीत म्हणून याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

राजपाल यादव यांनी २०१० मध्ये इंदोर मधील सुरेंद्र सिंह यांच्याकडून ५ करोड रुपये कर्ज घेतलं होत. काही दिवसातच पैसे परत करण्याचे आश्वासन देखील राजपाल यादवने दिले होते. मात्र हि रक्कम परत करण्यास तो अपयशी ठरला.

राजपालने २०१५ मध्ये हे कर्ज परत करण्यासाठी मुंबईमधील ऍक्सिस बँकेचा चेक सुरेंद्र सिंह यांना दिला होता. परंतु तो चेक बाउन्स झाला.

पैसे न मिळाल्यामुळे सुरेंद्र सिंह यांनी राजपाल यादव यांना वकिलांकडून एक नोटीस पाठवली, परंतु राजपाल यादव यांनी या नोटीसला कोणतंच उत्तर दिल नाही. म्हणून सुरेंद्र सिंह यांनी आपले पैसे मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने दोघांना सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी सांगितलं होत. मात्र राजपाल यादव यांनी हे प्रकरण गंभीरपणे न घेता पैश्यांची परतफेड केली नाही. म्हणून उच्च न्यायालयाने कर्ज फेडण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्यामुळे अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने ३ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *