Rashmi Anpat and Amit Khedekar Having Baby Boy | Baby Shower

Rashmi Anpat and Amit Khedekar Having Baby Boy | Baby Shower

मराठी अभिनेत्री रश्मी अनपटने कुलस्वामिनी या मालिकेत आरोहीची भूमिका साकारली होती. हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेनेनंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. तरीही ती आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर खूप ऍक्टिव्ह असते.

रश्मी अनपटच्या पतीचे नाव अमित खेडेकर असून त्यांनी २३ डिसेंबर २०१३ रोजी लग्न केलं होत. लग्नापूर्वी २ वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होत.

काही दिवसांपासून रश्मीने तिच्या प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्याचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी तिच्या सोसिअल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. काल नुकताच तिने तिच्या सोसिअल मीडिया अकाउंट वर तिच्या पतीसोबत फोटो पोस्ट केला कि त्यांना १३ ऑक्टोबर २०१८ ला मुलगा झाला आहे.

हे फोटो पाहून तिचे काही चाहते संभ्रमात आहेत कि तिने २-३ दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो पोस्ट केले होते आणि लगेच मुलाचे फोटो कसे काय आले? तर त्याच झालं असं कि रश्मी आणि अमित यांना १३ ऑक्टोबर २०१८ लाच मुलगा झाला होता, परंतु रश्मीने तिच्या प्रेग्नन्सीचे फोटो खूप उशिरा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या मुलाचे फोटो कालच त्यांच्या सोसिअल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. रश्मी आणि अमित खेडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Photos:

Tags: Rashmi anpat son, Rashmi anpat baby shower, rashmi anpat baby boy, rashmi anpat and amit khedekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *