रोहित पवारांविरोधात कटकारस्थान – विरोधकांचा डाव

रोहित पवारांविरोधात कटकारस्थान – विरोधकांचा डाव

विधानसभा निवडणुकांचे प्रचार हे रंजक वळणावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशीच एक बातमी कर्जत-जामखेड मतदार संघातून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि रोहित पवारांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. पवार कुटुंबाचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीची बरीच ताकद इथे लावली जात आहे. रोहित पवार यांच्या प्रचाराची रणनीती त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी त्यासाठी कटकारस्थान आखले आहे.

त्यामध्येच राष्ट्रवादीचे काही नाराज स्थानिक नेते आणि कार्यकर्ते राम शिंदेंना मदत करत असल्याचं चित्र समोर येतंय. त्यामुळे रोहित पवार हे चांगलेच अडचणीत आल्याचे समजतंय. नुकतंच पार्थ पवार यांना लोकसभेला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदार संघात विशेष लक्ष घातलं जातंय. पण विरोधकांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने सुरु केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. पण रोहित पवारच निवडणून येणार असं उत्साह सुद्धा कार्यकर्त्यांनी दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *