मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला रोहित पवार यांचं सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला रोहित पवार यांचं सडेतोड उत्तर  

कर्जत-जामखेड या मतदार संघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना एक भाजपच्या तुल्यबळ नेत्याशी होतोय. त्यांच्याविरोधात भाजपचे एकनाथ शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. दोघांचा प्रचारही जोरदार चालू आहे. भाजपने आणि एकनाथ शिंदेनी अनेक डाव रोहित पवार यांच्याविरोधात रचण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. याचदरम्यान, त्यांनी बरीच टीका देखील रोहित पवार यांच्यावर केली आहे.

या सर्व टीकांचा विचार न करता रोहित पवार यांनी आपला प्रचार चालू ठेवला आहे. या टिकेचाच एक भाग म्हणजे रोहित पवार हे कर्जत-जामखेड या मतदार संघातून का लढत आहे, अशी विरोधांकडून टीका केली जात आहे. यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणतात, या मतदार संघात विकास कामे करण्यास वाव आहे. या मतदार संघात काहीच विकास झालेला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, यावर भरपूर काम राहिलेली आहेत. त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे.

पुढे रोहित पवार म्हणतात, शिक्षणाचाही मूलभूत सोयी या मतदार संघात झालेल्या नाहीत, त्या सर्व सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडवायचा आहे. अशी अनेक कामे मला या मतदार संघात करायची आहे. या मतदार संघात विकासकामांचं आव्हान आहे, आणि ते आव्हान मला स्वीकारायला आवडेल.

यामध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेलाही उत्तर दिल. राम शिंदे यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीचे पार्सल परत पाठवा अशा शब्दात रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आता कोणी सिरिअस घेत नाही. त्यामुळं त्यांचं मी मनावर घेत नाही अशी फिरकी मुख्यमंत्र्यांची त्यांनी घेतली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *