आरे प्रकरणावरून धावांसारखा कडाडला रोहित शर्मा प्रशासनावर

आरे प्रकरणावरून धावांसारखा कडाडला रोहित शर्मा प्रशासनावर

मुंबईच्या आरे कॉलनीतील बरीच झाडे काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात आली होती. त्यामुळे अख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक तरुणांनी आंदोलने केली. त्यांनाही सरकारने अटक केली. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी याला विरोध दर्शवला. मग कोर्टानेच यामध्ये हस्तक्षेप केला आणि झाडे न तोडण्याचा आदेश सरकारला जारी केला. त्यानंतर झाडे तोड बंद करण्यात आली.

आरे प्रकरणावरून भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माही मेट्रो प्रशासनावर कडाडला आहे.

” जीवनात ज्या वस्तूंची नितांत गरज असते, अशा गोष्टी नसत करून कस चालेल ?” असा प्रश्न रोहित शर्माने केला. रोहित पुढे म्हणतो, ‘ मुंबईत हरितपट्टा तयार करण्यासाठी आणि वातावरण संतुलित ठेवायला आरेने मोलाचा वाट उचलला आहे. असा अत्यंत महत्वाचा असलेला मुंबईतील हरितपट्टा नष्ट करणं चुकीचं आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार हे वेगळं नमूद करायची गरज नाही ‘, अशा शब्दात प्रशासनाचा निषेध रोहितने व्यक्त केला.    M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *