कसा आहे प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा ‘साहो’ चित्रपट? – Saaho Movie Review in Marathi

कसा आहे प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा ‘साहो’ चित्रपट?

अभिनेता प्रभासचा बहुचर्चित साहो सिनेमा अखेर प्रदर्शित झाला असून चित्रपटाचा नायक सिद्धांत नंदन (प्रभास) हा एक अंडर कव्हर एजंट आहे. सिद्धांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अमृता नायर (श्रद्धा कपूर) हिच्या प्रेमात असतो. या दोघांवर मुंबईतील 2000 कोटींच्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या दरोड्याचा तपास करताना त्यांना एका ब्लॅक बॉक्सचा शोध घ्यायचा असतो.


या दरोडा प्रकरणाचा तपास करताना चित्रपटाची कथा जगभरातील विविध शहरात रंगत जाते. प्रत्येकवेळी सिद्धांत नंदनला वेगवेगळ्या खलनायकांचा सामना करावा लागतो. चित्रपटाच्या पूर्वाधातच जबरदस्त ऍक्शनची सुरुवात होते. सुरुवातीपासूनच रुपेरी पडद्यावर प्रभासचा प्रभाव जाणवू लागतो. दरम्यान चित्रपटात साहो कोण? साहोचं नेमकं गूढ काय आहे?, या सगळ्याची उत्तरं मिळवण्यासाठी साहो चित्रपट पाहावा लागेल.


साहो या चित्रपटाची कथा एवढी काही खास नाही आणि त्यामुळे चित्रपट लांबल्यासारखे वाटतो. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच विचार करायला लावते. या चित्रपटात ऍक्शन सिन जबरदस्त आहे

अभिनय कसा आहे?

अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांनी आपल्या भूमिकेला न्याय द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.
चित्रपटातील जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, टिनू आनंद, मंदिरा बेदी, मल्ल्याळम स्टार लाल, अरुण विजय, चंकी पांडे या खलनायकांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

सिनेमा पाहावा कि नाही?

चित्रपटातील ऍक्शन मस्त आहेत. ऍक्शन चित्रपटप्रेमींसाठी हा चित्रपट बरा आहे. प्रभास-श्रद्धाची केमिस्ट्री, तुफानी ऍक्शन आणि स्टारकास्टमुळे साहो रसिकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे.

सिनेमाचे संगीत कसे आहे?

चित्रपटाची गाणी उत्तमरित्या चित्रीत करण्यात आली आहे. जॅकलिन फर्नांडिसने ‘बॅड बॉयज’ या गाण्यातून रसिकांना घायाळ केले आहे. या गाण्यासाठी दर्जेदार लोकेशन्स, श्रद्धाच्या दिलखेचक अदा, आणि प्रभासचा डान्स यामध्ये उत्तम दाखवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *