मनसेच्या प्रचारासाठी या अभिनेत्याची हजेरी

मनसेच्या प्रचारासाठी या अभिनेत्याची हजेरी

विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यामध्येच मनसेनेही आपली कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी पक्षप्रमुख राज ठाकरे हे देखील प्रचार सभा घेत आहेत. त्यामध्ये आता मराठी अभिनेत्यांनीही हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत काम केलेले मराठी अभिनेते म्हणजेच संजय नार्वेकर.

संजय नार्वेकर हे मनसेच्या प्रचारासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संजय नार्वेकर हे माहीमचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी गेले होते. त्यांनी मतदारांच्या घरी जाऊन संवाद देखील साधला. यावेळी संजय नार्वेकर उमेदवार संदीप देशपांडेंबद्दल म्हणले कि, “संदीप देशपांडे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक चांगले उपक्रम हाती घेतले. ते नेहमी जनतेच्या बाजूने उभे राहिले आहे. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून प्रचारासाठी आलो आहे”.

माहीम मधून संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *