म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरूद्ध माघार

Shadar Pawar

म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरूद्ध माघार

विधानसभा निवडणुकांमध्ये रंजक अशा घडामोडी घडत आहे. मनसेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीने कोथरूड मतदार संघातील उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एका मतदार संघातून माघार घेतली आहे. एकनाथ खडसेंच्या कन्या निवडणूक लढत असलेल्या मुक्ताईनगर या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांनी देखील माघार घेऊन सगळ्यानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाचा आदेश असल्याने माघार घेतली असल्याचं रवींद्र पाटील यांनी सांगितलं.

यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी यामागील कारण सांगितलं. राज्यातील अशा काही मतदार संघातून माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शरद पवार म्हणतात, ” यंदाची विधानसभा निवडणूक ही आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. भाजप-सेनेला पराभूत करणे हे आमचं प्रमुख लक्ष्य आहे. त्यामुळे रवींद्र पाटील यांना आम्ही उमेदवारी माघार घेण्याची विनंती केली.

त्यामुळे मुक्तनागाई विधानसभा निवडणुकीचे चित्रच बदलेलं दिसत. शिवसेनेचं बंडखोर नेते चंद्रकांत निंबा पाटील आणि एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांची सरळ सरळ लढत रंगणार आहे. त्यामुळे ही लढत खूप रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *