शिवसेनेच्या या खासदाराला होणार दंड?

शिवसेनेच्या या खासदाराला होणार दंड?

महाराष्ट्र राज्यातील वाहतुकीचे, ट्रॅफिकचे नियम हे खूप जाचक आहेत, असा सूर महाराष्ट्रातील जनतेने मागील काही दिवसात धरला होता. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जनतेकडून बक्कळ रक्कम दंड म्हणून वसूल केली. मध्यंतरी याच प्रकरणावरून खूप असंतोष जनतेमध्ये निर्माण झाला होता. सरकार हे जनतेवर दडपशाही आणि अन्याय करत असल्याचा रोष लोकांनी व्यक्त केला होता. मात्र, एखाद्या राजकारण्याने वाहतुकीचे नियम किंवा कोणताही नियम तोडल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा दंड किंवा शिक्षा होत नाही अशी खंत देखील जनतेमध्ये असल्याचं चित्र आहे. असच एक उदाहरण समोर येतंय.

राजकारणाच्या या धूमशाहीत सध्या एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. उस्मानाबादमधील शिवसेनेचे खासदार रामराजे निंबाळकर यांचा तो विडिओ. या विडिओ मध्ये रामराजे हे त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांसोबत बुलेटवरून प्रचार करत असल्याचं दिसत. त्यांनी हेल्मेटसुद्धा घातलेलं नाही. वाहतुकीच्या नियमानुसार दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणं गुन्हा आहे. दुसरं म्हणजे, प्रवास करताना हेल्मेट वापरणं हे बंधनकारक आहे. पण शिवसेनेच्या खासदाराने या दोन्ही नियमांचे उल्लंघन केल्याचं दिसत. आता जनतेकडून विचारणा केली जात आहे कि, या खासदाराला शिक्षा किंवा दंड करणार का? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *