शिवसेना वचननामा

शिवसेना वचननामा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोऱ्यात चालू आहे. नेत्यांच्या भाषणात बरीच आश्वासने देताना आपण ऐकतो. या निवडणुकांमध्ये पक्ष आपला जाहीरनामा करत असतात. या जाहीरनाम्यात त्यांनी आगामी ५ वर्षात काय काय करणार हे नमूद केलेले असते. पण ही कामे केली जातात का, हे मात्र जनता राजकारण्यांना विचारायचं विसरून जाते. हे सगळं सांगण्याचं मुद्दा म्हणजे शिवसेने आताच शिसेना पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याचं प्रकाशन हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे.

प्रकाशनाच्या वेळी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हटले कि, वचननाम्यात वचनं ही विचार करून देण्यात आलेली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. या वचननाम्यात १० रुपयांत सकस जेवण देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. यातील कोणतंही वचन खोटं ठरणार नाही, असं आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं कि, १ रुपयात आरोग्याची चाचणी करून देण्यात येईल. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेच्या असतात त्या चाचण्या १ रुपयात करून दिल्या जातील आणि विजेचे घरगुती दर हे ३० टक्क्यांनी कमी करण्यात येतील अशी आश्वासने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. पुढे आदित्य ठाकरे म्हणतात, हा वचननामा सर्व मागण्यांचा आणि बाबींचा विचार करून तयार करण्यात आला आहे. या वाचनाम्यात महिलांचाही समावेश करण्यात आलेला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *