Shreenivas Pokle Wiki, Biography, Age, Family, Movie – Naal Movie

Shreenivas Pokle Wiki, Biography, Age, Family, Movie – Naal Movie

सैराट आणि फॅन्ड्री चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित नाळ चित्रपट देखील प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटात चैत्याची भूमिका श्रीनिवास पोकळे या लहान कलाकाराने साकारली आहे. “आई मला खेळायला जायचंय. जाऊ दे न व…” या गाण्याकडे प्रेक्षक खूपच आकर्षित झाले आहेत. आज आपण चैत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत.

चैत्याचे खरे नाव श्रीनिवास गणेशराव पोकळे असून त्याचा जन्म १३ मार्च २००९ साली अमरावती मधील दस्तूर नगर येथे झाला. त्याच्या आईचे नाव अर्चना आणि वडिलांचे नाव गणेशराव पोकळे आहे. श्रीनिवास आत्ता अमरावतीमधील “द्वारकानाथ अरोरा इंग्लिश प्रायमरी स्कूल” मध्ये शिकत आहे. तो जेव्हा दुसरीत होता तेव्हा त्याचं selection नाळ या चित्रपटासाठी झालं होतं. नाळ चित्रपटाच्या टीमने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा याच मुलाला चैत्याची भूमिका द्यायची असं त्यांनी ठरवलं कारण त्याच रांगडं बोलणं, चालणं आणि मनमुराद हसणं चैत्याच्या भूमिकेसाठी अगदी योग्य होतं. नाळ चित्रपटाची टीम अशा मुलाच्या शोधात होती कि जी चैत्याची खोडकर व्यक्तिरेखा साकारेल आणि त्यांना श्रीनिवास मध्ये ते सर्व गुण दिसले.

नाळ चित्रपटासाठी जेव्हा त्याच selection झालं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी शाळेतून परवानगी काढली आणि काही दिवसांसाठी तो अभिनय शिकण्यासाठी पुण्यात आला. पुण्यात त्याने काही दिवस अभिनय केला, त्याला कॅमेरा समोर कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे हावभाव द्यायचे हे सर्व शिकवण्यात आलं. अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना त्याने भल्या भल्या कलाकारांना जमणार असं काही करून दाखवलं.

नाळ या चित्रपटाच्या शूटिंग साठी तब्बल दोन वर्ष लागली. सुधाकर रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली श्रीनिवास ने अप्रतिम असा अभिनय केला. आज सगळीकडे श्रीनिवास च्या कामाची वाह वाह होतं आहे. श्रीनिवास पोकळे च्या भावी आयुष्यासाठी atoz मराठी चॅनेल कडून खूप खूप शुभेच्छा.

 

Tags: Shrinivas Pokale Biography, Shrinivas pokale, Shreenivas pokale, Shrinivas pokale in naal movie, shrinivas pokale family, shrinivas pokale age, shrinivas pokale movie,श्रीनिवास पोकळे, नाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *