Shut Down Tula Pahate Re Serial by Social Worker – तुला पाहते रे मालिका बंद करा.

Shut Down Tula Pahate Re Serial by Social Worker – तुला पाहते रे मालिका बंद करा.

तुला पाहते रे या मालिकेने TRP मध्ये उच्चांक गाठला आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेत वयाचं कसलंही बंधन न दाखवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीवर विक्रांत खूप प्रेम करतो असं दाखवण्यात आलं आहे.

या मालिकेत २० वर्षांची मुलगी ४० वर्षीय पुरुषच्या प्रेमात पडली आहे असं दाखवलं आहे.त्यामुळे “तुला पाहते रे” हि मालिका बंद करावी अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तुला पाहते रे मालिकेतून कोणताही समाज प्रबोधनाचा संदेश दिला जात नाही, याउलट चुकीचा संदेश समाजात जात असल्याचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी म्हंटले आहे.

२० वर्षाची मुलगी ४० वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडणे हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. या मालिकेतून समाजाला वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न या मालिकेतून होत आहे, असं सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी निवेदनात लिहिलं आहे.

या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील २० वर्षीय मुलीचे लग्न ४० वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी,’ असं प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटलं आहे.

इशा आणि विक्रांत यांच्या तुला पाहते रे या मालिकेतील प्रेमकथेवर प्रेक्षकांचे खूप मतभेद आहेत. त्यामुळे कॉलेज मध्ये जाणारी २० वर्षीय मुलगी आणि ४० वर्षीय पुरुष यांच्यातली प्रेमकहाणी नवीन पिढीसाठी घातक आहे त्यामुळे हि मालिका बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

तर मित्रानो तुम्हाला काय वाटतंय खरंच हि मालिका नवीन पिढीसाठी घातक आहे कि नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कंमेंट करून नक्की कळवा.

4 thoughts on “Shut Down Tula Pahate Re Serial by Social Worker – तुला पाहते रे मालिका बंद करा.

  1. Chukicha sandesh tar nakki h nai yet aahe tula pahate re madhun.. N old time madhe husband wife madhe10- 15 years cha gap tar asaycha As majhya navryachi bayko madhe guru la bayko astana suddha extra maratial affair dakhavla.. Haan sandesh kuthe changla aahe mag.. Jar apan asa bhagitla tar sarvyach serials band karayla havay… Pratyek serial madhe kahi na kahi problem. S astat.. Apan tyana positive way madhe ghyala Hawe..

  2. Mala nahi vatat chukich sandesh ahe karan aplya ajubaju apan baghto aae vadilach 15 the 18 vayacha mothya mulashi aplya mulich lagna kartat he vastavik ahe. TV war dakhavtat techat chukich Kay? Picture madhe etka dahashadwad,rape dakhavtat te changla ahe ka? Loka enjoy kartat karudena kay problem ahe??

  3. मला नाही वाटत हि सिरीयल चुकीचा संदेश देत असेल । समाजात अशी घटना खूप घडत आहे । आणि प्रेम हे आंधळं असत कारण प्रेमात जात पात वयाची मर्यादा काहीच नसते आणि सिरीयल ला फक्त मनोरंजन म्हणून पाहण्यास काय हरकत आहे ? सिरीयल बंद पडली म्हणजे असे प्रकार थांबणार आहेत का ? तर मला नाही वाटत सिरीयल बंद करावी । सुबोध भावे आणि गायत्री दातार ने खूप उत्तम अभिनय केला आहे ।

  4. तुला पाहते मालिका काही चुकीचे दाखवत नाही. तसे पाहिले तर बर्याच मालिकेत विवाह बाह्य संबंध दाखविला जातो तो समाजाचा साठी घातक नाही का? एक मनोरंजन म्हणून मालिका पहावी व आनंद घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *