सृष्टी पगारे बद्दल जाणून घ्या बरंच काही!

सृष्टी पगारे ही एक लहान मराठी गायिका आहे. तिचा जन्म १३ नोव्हेंबरला झाला. तिने सूर नवा ध्यास नवा या सिंगिंग रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये खूप गाणी गायली आहेत आणि सृष्टीची निवड टॉप १० स्पर्धकांमध्ये झाली होती. या शोला अभिनेत्री स्पृहा जोशी होस्ट होती. तिला अभिनयाची आवड असल्याने ती स्पृहा जोशी सोबत कधी कधी या शोमध्ये अभिनय देखील करायची.

सृष्टी सूर नवा ध्यास नवा या शोच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यामुळे तिला कलर्स मराठी वरील स्वामीनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सुरुवातीला सृष्टीचे आईवडील मालिकेत काम करण्यासाठी राजी नव्हते परंतु नंतर त्यांचा होकार मिळाला.

सृष्टी पगारे स्वामीनी या मालिकेतून अभिनयात आपलं पदार्पण करत आहे. या मालिकेत ती माधवराव पेशवे म्हणजेच रमाबाई पेशवे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या सोबत मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय पटवर्धन हा माधवराव पेशवे यांची भूमिका साकारत आहे आणि ऐश्वर्या नारकर या गोपिकाबाई पेशवे यांची भूमिका करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *