Subodh Bhave Love Story, Family – Manjiri Bhave | सुबोध भावेची प्रेमकथा

Subodh Bhave Love Story – Manjiri Bhave | सुबोध भावेची प्रेमकथा

सध्या झी मराठीवरील तुला पाहाते रे हि मालिका TRP मध्ये अव्वल आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार मुख्य भूमिकेत आहेत. हि मालिका आपल्याला असं प्रेम दाखवत आहे कि ज्यात वयाच कसलंही बंधन नाही. हि मालिका प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली आहे.

सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतला एक नामांकित अभिनेता आहे, त्यामुळे तो जे पण काम करेल ते त्याच्या चाहत्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. सुबोध भावे यांनी खूप चित्रपट देखील केले आहेत. आज आम्ही तुम्हाला सुबोध भावेंच्या पत्नीविषयी काही गोष्टी सांगणार आहोत.

सुबोध भावेच लग्न २००१ मध्ये त्यांच्या लहानपणीच्या मैत्रिणीशी म्हणजेच मंजिरी भावे यांच्याशी झालं. पहिलीपासून दहावीपर्यंत मंजिरी आणि सुबोध एकाच वर्गात होते. शाळेत असताना ते एकमेकांवर खूप प्रेम करायचे. जेव्हा सुबोधने तिला प्रोपोस केला तेव्हा, मंजिरी देखील हो म्हणाली. जवळजवळ ११ वर्ष यांचं हे प्रेम प्रकरण चाललं होत. सुबोध भावे जेव्हा त्यांच्या जीवनाच्या अतिशय कठीण वळणावर होता तेव्हा सुबोध च्या आई वडिलांएवढा सपोर्ट मंजिरीने देखील दिला होता.

सुबोध भावेने कधीच आपण एवढे मोठे कलाकार होऊ असा विचार केला नव्हता पण काळाच्या बदलत्या ओघात तो वाहत गेला आणि आज तो जो काही आहे तो आपल्या पत्नीमुळे आणि घरच्यांमुळे आहे असं तो म्हणतो. सुबोध आणि मंजिरी यांचं हे प्रेमप्रकरण ११ वर्ष चाललं. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली. आत्ता याना दोन मुलं देखील आहेत. त्यांची नावे कान्हा आणि मल्हार आहेत. सुबोध भावे हा पुण्याचा रहिवासी आहे, परंतु आत्ता तो त्यांच्या कामानिमित्त मुंबई मध्ये आपल्या परिवारासोबत राहत आहे. सुबोध भावे आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप सदिच्छा!

Photos:

Tags: Manjiri Bhave, Subodh Bhave Wife, Subodh Bhave wife Manjiri Bhave, Subodh Bhave family, Subodh Bhave Biography, सुबोध भावे, सुबोध भावेची प्रेमकथा, सुबोध भावेची पत्नी, सुबोध भावेची बायको, मंजिरी भावे

One thought on “Subodh Bhave Love Story, Family – Manjiri Bhave | सुबोध भावेची प्रेमकथा”

  1. khup khup great ahet subodh sir.me subodh bhave siranch ya agodar ekpn film athva seriol nahi pahile . pn mala vikrant sarnjame mhanun ewdhe manala bhavlena me shabdat sangu shakat nahi..siranch role mhanje tyat jivantpana pratyaksha bhavna amcha samor janu kahi real ahe ka as watatay? khup khup chan sir ani all team specially .mrs.nimkar ani mr.nimkar i love him. and zende

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *