बाळूमामा च्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे बद्दल बरंच काही!

सुमित पुसावळे बद्दलची सर्व माहिती:

सुमित पुसावळे हा एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याचा जन्म डिसेंबर १९९० रोजी दीघंजी या छोट्याशा गावात झाला. त्याने शालेय शिक्षण याच छोट्या गावातून म्हणजेच दीघंजी मधून पूर्ण केले. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी पुण्याला आला. पुणे युनिव्हर्सिटीतून त्याने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतली. त्याच्या वडिलांचं नाव सावंता पुसावळे असं आहे . त्याचे वडील हे शेतकरी आहे आणि त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे आणि ते करतात. सुमित ने त्याच शिक्षण पूर्ण झाल्यावर ३ वर्ष हॉटेल इंडस्ट्रीत ३ वर्ष जॉब केला. त्याला स्वतःच रेस्टॉरंट सुरु करायचं आहे.

सुमित हा मराठी इंडस्ट्रीत नवा चेहरा आहे. सुमितला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. तो अगदी लहानपणापासून कॉलनीत, शाळेमधील सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये भाग घ्यायचा. तो १२ मध्ये असताना त्याने कॉलेज मधील मराठी नाटकामध्ये काम केलं होत. या नाटकाचं नाव होत पत्रे सरकार. या नाटकामध्ये त्याने नागनाथ अण्णा हे पात्र साकारलं होत. हे नाटक फ्रीडम फायटर यांच्यावर आधारित होत.

सुमित ने मराठी चित्रपट सृष्टीत सरगम या चित्रपटातून पाहिलं पाऊल टाकलं. या चित्रपटात त्याने छोटी भूमिका केली होती. करिअरमध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी तो मुंबई ला आला. मुंबईमध्ये हिंदी  सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या प्रोडक्शनसाठी त्याने मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून चार चित्रपटांसाठी काम केलं. त्याने एक विडिओ अल्बमही मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून केला आहे. त्यानंतर त्याचा मित्र मंगेश बनकर याने त्याला मॉडेलिंग आणि अभिनयासाठी प्रोत्साहित केलं. मग सुमित ने गोवर्धन कंपनीसाठी फोटोशूट केलं.

सुमित ने मराठी टेलिव्हिजनवर झी मराठी चॅनेल वरील लागीर झालं जी या मालिकेतून आपलं दमदार पदार्पण केलं. त्याने या मालिकेत खलनायक पद्धतीची भूमिका साकारली होती. त्याने सुम्या म्हणजेच एका फौजीच पात्र साकारलं होत. हे पात्र खूप अहंकारी होत म्हणजेच या पात्राला नेहमी पहिलं यायचं असत. या मालिकेत नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सुमितला खऱ्या अर्थाने या भूमिकेमुळे इंडस्ट्रीमध्ये एक ओळख मिळाली.

लागीर झालं जी या मालिकेच्या यशामुळे त्याला अनेक भूमिका मिळाल्या. सुमित सध्या कलर्स मराठीवर चालू असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत मुख्य भूमिका करत आहे. या मालिकेत तो बाळूमामा या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. त्याच्या सोबत मुख्य भूमिका कोमल मोरे साकारत आहे. तिने बाळुमामाची पत्नी म्हणजेच सत्यवाची भूमिका केली आहे. ही मालिका बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित आहे. सुमित ने याआधी स्वराज्य रक्षक संभाजी या झी मराठी वरील मालिकेमध्ये छोटीशी भूमिका केली होती.  

Tags: Sumit Pasavale, Sumit Pasavale biography, Sumit Pasavale wiki, Sumit Pasavale birthday, Sumit Pasavale age, Sumit Pasavale education, Sumit Pasavale family, Sumit Pasavale wife, Sumit Pasavale biodata, Sumit Pasavale actor, Sumit Pasavale balumama, Sumit Pasavale biography in Marathi, सुमित पुसावळे, सुमित पुसावळे माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *