स्वामीनी मालिका आजपासून येत आहे तुमच्या भेटीला

आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या पौराणिक कथांवर डेली सोप मालिका बनवण्याचा ट्रेंड चालू आहे. अशाच कथांवर सध्या आपण स्वराज्य रक्षक संभाजी आणि बाळुमामाच्या नावानं चांग भलं या मालिका टेलेव्हीसीन वरती पाहत आहोत. अशीच अजून एक मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे ती म्हणजे स्वामींनी.

स्वामींनी हि मालिका पेशवेकालीन संस्कृतीवर आणि वेषभूषेवरती आधारित आहे. ही मालिका स्वामी या कादंबरीचा संदर्भ घेऊन बनवली आहे.

स्वामींनी ही मालिका रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे. रमाबाई हे पात्र सिंगिंग रिऍलिटी शो मधील गायिका सृष्टी पगारे हिने साकारली आहे आणि माधवराव पेश्वेची भूमिका चिन्मय पटवर्धन याने साकारली आहे. यामध्ये या दोघांमधील निरागस प्रेम आणि त्याचबरोबर रामबाईची सासू म्हणजे गोपिकाबाई या सासू आणि सुनेचा टिपिकल संबंध पाहायला मिळेल. कारण गोपिकाबाईला रमाबाई सून म्हणून आवडत नसते. गोपिकाबाई हे पात्र सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी साकारलं आहे.

या मालिकेमध्ये गमतीशीर गोष्ट अशी आहे की, सृष्टी पगारे ही या मालिकेतून अभिनयात पदार्पण करत आहे आणि ऐश्वर्या ताईंनी आजपर्यंत खूप सोज्व्ल आणि समजूतदार अशा सासू आणि सुनेच्या भूमिका केल्या आहेत. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऐश्वर्या ताई कडक सासूची भूमिका कशी साकारत आहे. सृष्टी म्हणजेच रमाबाई या सासूबाईंच्या पसंतीस उतरणार का, हे पाहायला मिळणार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *